औरंगाबाद: शहराला भेडसावणार पाण्याचं प्रश्न येत्या दोन महिण्यात सोडवणार असल्याची प्रतिक्रिया आज उद्योग व अल्पसंख्यक राज्यमंत्री व औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांनी दिली. मंत्रिपद मिळाल्यानंतर आज सकाळी नऊ वाजता त्यांचे नगरनाक भागात आगमन झाले.
मनपाप्रशासन आणि सत्ताधारी-विरोधक यांच्या गलथान करभारा मुळे समांतर योजना बारगळली. यामुळे शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उन्हाळयात नळाला आठ दिवसाला पाणी येत होते, तर काही भागात पाणीच येत नसल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी देखील विकत घेण्याची वेळ आली होती. मागील दोन महिण्यात अनेक जलकुंभावर पाण्याच्या प्रश्नावरून नागरिकांनी आंदोलन केले. कुठे कर्मचाऱ्यांना मारहाण देखील झाली. एवढेच न्हव्हे तर महिलांनी पाण्याच्या टँकरवर ताबा केला. पाण्यावरून कधी नव्हे त्या एक ना अनेक घटना मागील चार महिन्याच्या कालावधीत घडल्या. शहराभोवती चिकलठाणा, वाळूज, शेंद्रा, चितेगाव अशा औद्योगिक वसाहती आहे. या वसाहती मधील कंपन्यांना देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचं आवश्यक पुरवठा केला तर उद्योगाला चालना मिळण्यास मदत होईल आणि नवीन उद्योग शहरात येतील. हीच गोष्ट लक्षात घेता औरंगाबाद शहरातील नागरिक व उद्योगनगरीचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडण्यासाठी येत्या दोन महिन्यात पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आत्मविश्वास आज उद्योग व अल्पसंख्याक मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे.
नगरनाका येथे सावेंचे जंगी स्वागत
औरंगाबाद पूर्व चे भाजपचे आमदार अतुल सावे मंत्रिमंडळ विस्तरामध्ये उद्योग आणि अल्पसंख्याक खाते मिळाल्यानंतर आज त्यांचं औरंगाबाद शहरात आगमन झाले या वेळी शहराच्या नागरनाका येथे शहरभाजप च्या वतीने त्यांचा ढोल ताशे, फटाक्याच्या अतिषबाजीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. उद्योग मंत्री सावे यांनी लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत शहरात प्रवेश केला. व तेथून वाहन रॅलीद्वारे शाहिदस्तंभला अभिवादन करून पुढे क्रांतिचौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली शहरात पुढे गेली या वेळी मराठवाडा विकास महामंडळ चे अध्यक्ष डॉ. भगवंत कराड, शहरअध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रवक्ते शिरीष बोराळकर, नगरसेवक राज वानखेडे, प्रमोद राठोड, माजी नगरसेवक अनिल मक्रिये, जिल्हा चिटणीस संजय फत्तेलष्कर, जिल्हा चिटणीस राजेंद्र कचरे, अभिजित जिरे, कैलास पुसे सह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची मोठी गर्दी होती










